Info
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ४ फेब्रुवारी १९५६ रोजी संघर्षाची व समाज परिवर्तनाची पुढील दिशा स्पष्ट करणारे नियतकालिक 'प्रबुद्ध भारत' सुरू केले. प्रबुद्ध भारतच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध जागृत झालेल्या समाजाला संघटित करून पुढील राजकारणाला, समाजकारणाला दिशा देण्याचा त्यांचा संकल्प होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रबुद्ध भारत च्या प्रकाशनाची जबाबदारी भैयासाहेब आंबेडकर यांनी पार पाडली. त्यानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर प्रबुद्ध भारताच्या प्रकाशनाची जबाबदारी पार पाडत आहेत. भांडवलदारांना शोषित, वंचित बहुजन समूहाचे आणि पुरोगामी चळवळींचे प्रश्न छापण्यात रस नाही आणि पेडन्यूजच्या जमान्यात बातम्या छापून आणणेही अशक्य होत आहे. प्रबुद्ध भारत सारखे हक्काचे माध्यम त्यामुळेच आवश्यक आहे. त्यामुळेच प्रबुद्ध भारतचे ऑनलाईन न्युज पोर्टलच्याद्वारे माध्यमातून डिजीटल स्वरुपात आगमन झाले आहे. सर्वच माध्यमे कार्पोरेट जगताच्या हातात असताना 'प्रबुद्ध भारत' बहुजनांचा आवाज आहे आणि राहील. संविधान मानणाऱ्या सर्व भारतीयांचे मुखपत्र म्हणून प्रबुद्ध भारत विधायक भूमिका पार पाडेल .
Tags
Stats
Joined Invalid Date
0 total views
Featured video