Info
मणिपूर जळत असताना आठ दिवसांचे कव्हरेज, इस्रायल आणि हमासमधील संघर्षाचे दहा दिवसांचे विश्लेषण… वर्ष 2023 हा अनुभव समृद्ध करणारे आणि विचार करायला लावणारा ठरले. देशांतर्गत आणि जागतिक राजकारण, धर्म, आंतरदेशीय संबंध यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली.
मणिपूरमधील आठ दिवसांच्या सततच्या कव्हरेजबद्दल देशभरातून कॉल आले. “मणिपूर का जळत आहे?” याचे सखोल विश्लेषण आवडल्याची प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी दिली. त्याचप्रमाणे इस्रायल आणि हमास संघर्ष कव्हर करताना देखील प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या अनुभवांमधून खूप काही शिकण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ती सतत चालू राहणार आहे.
याही माध्यमातून बातम्यांचे विश्लेषण, संयत मते, मुलाखती, तसेच राजकारण, धोरण आणि प्रशासनाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहोत. याशिवाय, सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांवरही लक्ष केंद्रित करण्याचे ध्येय आहे.
तुमच्या काही सूचना असतील तर जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया अधिक समृद्ध करतात आणि कामाला दिशा देतात.
Stats
Joined Invalid Date
0 total views